Chinchwad Crime News : विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चार जणांवर गुन्हा; पतीला अटक

एमपीसी न्यूज – हुंड्यासाठी सासरच्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी व्यक्‍त केला. याप्रकरणी सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी वाल्हेकवाडी, चिंचवड येथे घडली.

धनंजय विजय बांगर (वय 28), विजय बांगर (वय 57) आणि दोन महिला (सर्व रा. वृंदावन सोसायटी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी धनंजय बांगर याला अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत मयत विवाहितेच्या वडिलांनी (वय 50) सोमवारी (दि. 5) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या विवाहित मुलीला हुंड्याच्या पैशासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच गावी घर बांधण्यासाठी व घरातील कामावरून वेळोवळी तिला शिवीगाळ करून आर्थिक छळवणूक केली. या त्रासाला कंटाळून तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून सासरकडील आरोपींनी तिला ढकलून दिले असावे, असा संशय मयत विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.