Chinchwad Crime News : उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चार लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून घरातून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री दहा ते सव्वा दहा वाजताच्या कालावधीत बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.

योगेश गोपाळ जाधव (वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. हडपसर) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांच्या घरी असताना सोमवारी रात्री दहा ते सव्वादहा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या पर्समधून चार लाख रुपये किमतीचे 10 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी चोरून नेले.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.