Chinchwad crime News : चिंचवड, निगडी, तळेगाव, भोसरीमधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चिंचवड, निगडी, तळेगाव दाभाडे आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 1) चार वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सीताराम पांडुरंग भागवत (वय 55, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 27 सप्टेंबर रोजी रात्री दहा ते 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची 20 हजारांची दुचाकी (एमएच 14 / बीबी 4485) चोरून नेली आहे.

नामदेव मारुती पाटील (वय 42, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 18 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार ते सव्वापाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची 20 हजारांची दुचाकी (एमएच 14 / ईडी 6561) साई गार्डन, चिंचवड येथून चोरून नेली.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अतुल महादेव म्हाळसकर (वय 24, रा. तळेगाव स्टेशन) यांनी दुचाकी चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली आहे. अतुल यांची 20 हजारांची दुचाकी (एमएच 14 / एफएफ 7592) अज्ञात चोरट्यांनी तळेगाव दाभाडे येथील एका कंपनीच्या पार्किंगमधून चोरून नेली. हा प्रकार 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत घडला.

स्पाईन सिटी मॉल, मोशी प्राधिकरण येथून 28 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एक ते साडेतीन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एक लाखाची रॉयल इन्फील्ड बुलेट दुचाकी (एमएच 14 / एचएस 9494) चोरून नेली. याबाबत गोविंद भागवत वाघमारे (वय 25, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.