Chinchwad Crime News : कंपनीची साडेचार कोटींची फसवणूक; पाच महिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कंपनीची साडेचार कोटींची फसवणूक करुन धमकी दिल्या प्रकरणी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कल्याण ढाकणे, कुणाल ढाकणे, रमेश ढाकणे (तिघेही रा. दत्त मंदीर रोड, वाकड), राजू बिरारे, अहूवालिया आणि पाच महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत मदन झुंबरलाल कांकरिया (वय 71, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना 2008 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत लोकमान्य हॉस्पिटल समोर, गणेशनगर, चिंचवड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण ढाकणे याला ईलीया कंपनीच्या संचालक पदावरून कमी केले. त्यामुळे आरोपी कल्याण याने राजेंद्र कांकरिया यांना इफको कंपनीचे 40 टक्‍के भागभांडवल (दीड कोटी रुपये) आणि कर्जरूपी दिलेले 62 लाख रुपये दिले नाहीत. तसेच आरोपींनी आपसांत संगनमत करून इफको फिनिशेस अँड टेक्‍नॉलॉजिस या कंपनीच्या विरोधात कट रचला.

कपंनीच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करून अन्य व्यक्‍तींची निवड केली. कंपनीमधून आरोपींच्या सांगण्यावरून इफको कंपनीचे भांडवल, फर्निचर, मशिन, कच्चा माल कोणालाही न सांगता परस्पर चोरी करून नेला.

बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनी स्वतःच्या नावावर करून कंपनीची बॅलेन्सशीट बदलली. कंपनी नुकसानीत दाखवून चार कोटी 64 लाख रुपयांची फसवणूक केली.

तसेच इतर आरोपींनी हिंजवडी पोलीस ठाण्यात खोटी विनयभंगाची फिर्याद दिली. तसेच फिर्यादी कांकरिया यांच्या कुटूंबास धमकी देऊन मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दिला.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.