Chinchwad Crime News : गुन्हे शाखा युनिट चारकडून फरार चोरटा गजाआड; चोरीच्या चार दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तो सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार होता. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि. 25) भूमकर चौक, वाकड येथे केली.

विशाल विश्वनाथ कांबळे (वय 25, रा. काटे नगर, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी भूमकर चौकात येणार आहेत. त्याच्याकडे असलेली दुचाकी देखील चोरीची आहे.

त्यानुसार,युनिट चारच्या पोलिसांनी भूमकर चौकात सापळा लावून आरोपी विशाल कांबळे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 45 हजारांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे पिंपरी, वाकड, हिंजवडी, कोथरूड पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी विशाल कांबळे याच्या विरोधात यापूर्वी दंगा, तोडफोड तसेच जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस अंमलदार प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, रोहिदास आडे, आदिनाथ मिसाळ, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, आजिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.