Chinchwad crime News : वाल्हेकरवाडीत किराणा मालाच्या दुकानातून अडीच लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील एका किराणा मालाच्या दुकानात प्रतिबंधित गुटखा आढळला. सामाजिक सुरक्षा विभागाच्या ( social Security Department) पोलिसांनी दोन लाख 43 हजारांचा गुटखा (Gutkha) जप्त करत दुकानदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला.  ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सायंकाळी सव्वापाच वाजता करण्यात आली.

भवरलाल नारायणलाल चौधरी (वय 45, रा. वाल्हेकवरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक महेश बारकुले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (chinchwad Police station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भवरलाल याचे वाल्हेकरवाडी येथील एका चौकात किराणा मालाचे दुकान आहे. त्याने दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास दुकानावर छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी दुकानातून दोन लाख 43 हजार 149 रुपयांचा विमल पान मसाला गुटखा, 17 हजार 845 रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 60 हजार 994 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.