Chinchwad Crime News : चाकण, पिंपरीत पाच लाखांचा गुटखा पकडला

एमपीसी न्यूज – चाकण जवळ वाकी बुद्रुक येथे चाकण पोलिसांनी कारवाई करून दोन लाख 12 हजार 400 रुपयांचा तर सामाजिक सुरक्षा पथकाने मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे कारवाई करून 67 हजार 547 रुपयांचा गुटखा पकडला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 5 लाख 39 हजार 857 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाकी बुद्रुक येथे एक टेम्पो थांबला असून त्यात अवैधरित्या गुटखा भरला असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून चाकण पोलिसांनी सोमवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता कारवाई केली.

टेम्पोमधून 2 लाख 12 हजार 400 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि अडीच लाखांचा टेम्पो (एम एच 14 / ए झेड 3629) असा 4 लाख 62 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोबरन उर्फ रिंकू राजकुमार प्रजापती (वय 20, रा. कडाचीवाडी, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

सामाजिक सुरक्षा पथकाला सोमवारी (दि. 15) सायंकाळी माहिती मिळाली की, मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे अजमेरा कॉम्प्लेक्समध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरु आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून कारवाई केली. यात 67 हजार 547 रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा, 910 रुपये रोख रक्कम, 9 हजारांचे दोन मोबाईल फोन असा एकूण 77 हजार 457 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यामध्ये जगदीश नागराज गोंडा (वय 35, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिसांनी तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.