Chinchwad Crime News : कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग आणि फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज देण्याच्या बहाण्याने तिघांनी मिळून महिलेची आर्थिक फसवणूक केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. हा प्रकार 19 डिसेंबर 2020 रोजी घडला.

गोविंद किसनराव सावंत (रा. घरकुल, चिखली), गौतम शिरसाठ आणि गोविंद याची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 4 मार्च रोजी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंद याने फिर्यादी महिलेला कर्ज देण्यासंदर्भात वेळोवेळी व्हाट्सअपवर अश्लील मेसेज केले. महिलेचा पाठलाग करून तिला पाच लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला.

_MPC_DIR_MPU_II

सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेला पाच लाख रुपये कर्ज देण्याच्या बहाण्याने कर्जाच्या प्रोसेसिंग फीसाठी साडेपाच हजार रुपये घेतले. पैसे घेऊन महिलेला कर्ज दिले नाही. तसेच प्रोसेसिंग फीसाठी घेतलेल्या पैशांपैकी एक हजार रुपये महिलेला परत करून उर्वरित साडेचार हजारांची महिलेची फसवणूक केली.

आरोपी गोविंद आणि गौतम यांनी महिलेला कर्ज मिळाल्यानंतर त्यांना 30 हजार रुपये कमिशन म्हणून देण्याची देखील मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.