Chinchwad Crime News : तोंडात कोयता पकडून त्याचे सोशल मीडियावर प्रदर्शन करणाऱ्या कोयताभाईला अटक

एमपीसी न्यूज – तोंडात कोयता पकडून त्याचे सोशल मिडियावर प्रदर्शन करणाऱ्या आणखी एका कोयताभाईला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज अवधूत शर्मा (वय 18, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी शुभम तानाजी कदम यांनी सोमवारी (दि. 2) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शर्मा यांने कोयता तोंडात पकडलेला फोटो सोशल मीडियावर टाकला होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सोमवारी (दि. 2) रात्री सात वाजताच्या सुमारास दळवीनगर, चिंचवड परिसरातून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक कोयता हस्तगत केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.