Chinchwad Crime News : प्रेम संबंध ठेव म्हणून अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या मजनूला अटक

एमपीसी न्यूज – प्रेम संबंध ठेवण्यासाठी वारंवार फोन करून तसेच, भेटण्यासाठी बोलवून अल्पवयीन मुलीचा हात पकडणा-या मजनूला पोलिसांनी अटक केली आहे. जून ते 8 जुलै 2021 दरम्यान वाल्हेकरवाडी, चिंचवड याठिकाणी हा प्रकार घडला.

प्रदीप कृष्णकुमार आंबीलवादे (वय 20, रा. दत्तवाडी, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी फिर्यादी यांच्या सोळा वर्षीय मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी फोन करून वारंवार त्रास देत होता. तसेच 4 जुलै रोजी स्पाईन रोड, वाल्हेकरवाडी याठिकाणी मुलीला बोलून माझ्याशी प्रेम संबंध ठेव म्हणून तिचा हात धरून विनयभंग केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.