Chinchwad Crime News : पतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पतीच्या निधनानंतर मिळालेले डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 मार्च ते 28 जून 2021 या कालावधीत घडली.

याप्रकरणी 33 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 20) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेच्या पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर पतीच्या डेथ क्लेमचे 38 लाख 49 हजार रुपये विमा कंपनीने विवाहितेच्या खात्यात जमा केले. त्यातील 50 टक्के रक्कम आरोपींनी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास निघून जाण्यास सांगत त्यांच्याशी भांडण केले. त्यानंतर आरोपींनी विवाहितेला मारहाण करून घराबाहेर काढले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

स्त्री अत्याचाराच्या आणखी दोन घटना
लग्नात मानपान केला नाही. लग्नात सोने दिले नाही, या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 17 मे 2019 पासून वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 20) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात सोने दिले नाही. मानपान केला नाही. मुलगा दुबईला काम करतो त्याची कदर केली नाही असे म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपी पतीने विवाहितेच्या इच्छे विरुद्ध पॉर्न व्हिडीओ पाहून विवाहितेसोबत अनैसर्गिक संभोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

पतीने दारू पिऊन पत्नीला मारहाण केली. तसेच दोघांनी शिवीगाळ केली. तिघांनी विवाहितेच्या पतीला विवाहितेच्या विरोधात सांगून भडकावल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 मे 2013 पासून 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली.

पती कलीम मुस्तफा पठाण (वय 32, रा. लातूर), मुस्तफा पठाण (वय 68), अहमद मुस्तफा पठाण आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 20) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आरोपी कलीम याने दारू पिऊन घरातील किरकोळ कारणावरून तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. सासू आणि दोन नणंदांनी कलीम याला विवाहितेबाबत उलटसुलट सांगून विरोधात भडकवले. त्यामुळे कलीम याने विवाहितेला मारहाण केली. सासरे आणि दिराने देखील विवाहितेला घरगुती कारणावरून शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.