Chinchwad Crime News : कंपनीतून घरी निघालेल्या कामगाराला धाक दाखवून मोबाईल आणि पाकीट पळवले

0

एमपीसी न्यूज – कंपनीतून घरी जात असलेल्या कामगाराला धाक दाखवून दोन चोरट्यांनी मोबाईल फोन आणि पाकीट पळवून नेले. ही घटना 5 एप्रिल रोजी टाटा मोटर्स कंपनीजवळ चिंचवड येथे घडली असून याबाबत 8 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

भरत मनोहर फड (वय 30, रा. चिखली) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 5 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता टाटा मोटर्स कंपनीतून घरी जात होते. त्यावेळी त्यांना दोन अनोळखी चोरट्यांनी रस्त्यात अडवले. त्यांना धाक दाखवून त्यांच्याकडील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि तीन हजार रुपये रोख रक्कम व कागदपत्रे असलेले पाकीट जबरदस्तीने चोरून नेले. घटना घडल्यानंतर फिर्यादी घाबरले होते. त्यामुळे त्यांनी तीन दिवसानंतर याबाबत तक्रार दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1
Leave a comment