Chinchwad Crime News: दुकान फोडून चोरट्यांनी पळवले दोन लाखांचे मोबाईल फोन

एमपीसी न्यूज – मोबाईलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून नऊ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 97 हजार 196 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना लिंक रोड, चिंचवड येथील कुणाल कम्युनिकेशन येथे शनिवारी (दि. 10) पहाटे पाच वाजता उघडकीस आली.

राजेश मुरलीधर तोतलानी (वय 44, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 11) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंक रोड चिंचवड येथे फिर्यादी तोतलानी यांचे कुणाल कम्युनिकेशन नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेआठ वाजता तोतलानी यांनी त्यांचे दुकान कुलूप लाऊन बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.

दुकानातून सहा हजार रुपयांची रोकड आणि एक लाख 91 हजार 196 रुपयांचे नऊ मोबईल फोन असा एकूण एक लाख 97 हजार 196 रुपयांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी पहाटे पाच वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.