Chinchwad Crime News : डोळा मारल्याच्या गैरसमजातून एकाला मारहाण, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कोणाला तरी डोळा मारला, या गैरसमजातून एकाला मारहाण केल्याची घटना घडली आली. गुरूवारी (दि.10) वेताळनगर, चिंचवड याठिकाणी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

नितीन सोमा आरसुळ (वय 29), आकाश भागवत आरसुळ (वय 26) व दीपक भरत काळे (वय 21, सर्व रा. वेताळनगर, चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

सागर अशोक वाघमारे (वय 33, रा. वेताळनगर, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि.11) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी कोणाला तरी डोळा मारला या गैरसमजातून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, फिर्यादी यांची आई व बहिणीला देखील मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.