Chinchwad Crime News : टेल्को रोडवर दुकानाच्या लोखंडी ग्रीलला एकाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – एका अनोळखी व्यक्‍तीने टेल्को रोड, चिंचवड येथे 3 सप्टेंबर रोजी एका दुकानाच्या लोखंडी ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या व्यक्‍तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेल्को रोड, चिंचवड येथील काबरे हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या मे. पूनम सेल्स कॉर्पोरेशन या दुकानाच्या सेफ्टी गॅलरीच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याची माहिती कामगारांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गळफास घेतलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

मृत व्यक्‍तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृताचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. उंची पाच फूट 2 इंच, वर्ण गव्हाळ, चेहा उभट, दाढी-मिशी थोडी वाढलेली, अंगात शर्ट-पॅन्ट असा वेश परिधान केला आहे. या व्यक्‍तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक गणेश लोंढे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.