Chinchwad crime News : चिंचवडजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्थानकादरम्यान बिजलीनगरजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झाला. आज (दि. 27) सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ते पुणे डाऊनलाईनला बिजलीनगर जवळ सकाळी अकरा वाजता एक 42 वर्षीय इसम मृत आढळला. उद्यान एक्सप्रेसच्या लोकोपायलटने याबाबत पोलिसांना माहिती दिली. मृत इसमाची झडती घेतली असता त्यांच्याजवळ कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत.

मृत इसमाच्या डोक्याला मार लागला असून, लोकल मधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून अपघातामुळे मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.