Chinchwad crime News : चिंचवडेनगर येथील घरफोडीत एक लाखाची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख 14 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 6) दुपारी एक वाजता सोपान बाग कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

महेश दिनकर भिसे (वय 42, रा. सोपान बाग कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस पाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिसे यांचे घर 3 जानेवारी दुपारी तीन ते 6 जानेवारी दुपारी एक या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून एक लाख 14 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.