Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 94 जणांवर खटले

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 28) शहरातील 94 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.

सोमवारी पिंपरी चिंचवड शहरात 554 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे शहरात आजवर कोरोना बाधितांचा आकडा 76 हजार 633 एवढा झाला आहे.

शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येने पाऊण लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी एकाच दिवसात 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम न पळणा-यांवर पोलिसांकडून कारवाई करत खटले दाखल केले जात आहेत.

 पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार सोमवारी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (0), भोसरी (4), पिंपरी (15), चिंचवड (7), निगडी (8), आळंदी (8), चाकण (10), दिघी (4), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (9), वाकड (9), हिंजवडी (0), देहूरोड (9), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (5), रावेत चौकी (6), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.