Chinchwad crime News : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून रविवारी 88 जणांवर खटले

टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून नागरिक आपल्या आरोग्याची हेळसांड करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 23) 88 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे खटले दाखल केले आहेत. शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यात टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून नागरिक आपल्या आरोग्याची हेळसांड करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 750 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 41 हजार 648 झाली आहे. तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 6 हजार 629 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज 800 ते 1000 रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. टाळेबंदीचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र,काही नागरिक या नियमांना पायदळी तुडवत आहेत.

रविवारी (दि. 23) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (19), भोसरी (10), पिंपरी (9), चिंचवड (4), निगडी (7), आळंदी (0), चाकण (0), दिघी (2), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (6), वाकड (3), हिंजवडी (6), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (19), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.