Chinchwad crime News : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून रविवारी 100 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या आदेशाला पायदळी तुडवून कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 1) 100 जणांवर कारवाई केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधून सवलत दिली जात आहे. यामुळे सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. असे असताना काटेकोरपणे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. शासनाने याबाबत काही नियम घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

रविवारी शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (3), भोसरी (3), पिंपरी (23), चिंचवड (0), निगडी (2), आळंदी (0), चाकण (0), दिघी (9), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (47), वाकड (7), हिंजवडी (1), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (5), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.