_MPC_DIR_MPU_III

chinchwad Crime News : ऑनलाईन लॉटरी, गेम सेंटरवर पिंपरी पोलिसांचा छापा; 25 जणांवर कारवाई

2 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशनच्या समोर असलेल्या गवळीवाड्यात सुरु असलेल्या तीन ऑनलाईन लॉटरी सेंटर आणि दोन व्हिडीओ गेम पार्लरवर पिंपरी पोलिसांनी छापा मारला. त्यात पोलिसांनी 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत 2 लाख 84 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपींपैकी 22 जणांना अटकपूर्व जामिनावर सोडण्यात आले, तर तीनजण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

चिंचवड स्टेशनच्या समोर शिवाजी चौकात गवळी वाडा येथील एमबी क्लासिक बिल्डिंगमध्ये भाग्यश्री ऑनलाईन लॉटरी, जय महाराष्ट्र व्हिडीओ गेम, ओम व्हिडीओ गेम, राजश्री ऑनलाईन लॉटरी सेंटर आणि राजू लॉटरी सेंटर येथे ऑनलाईन जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार, पिंपरी पोलिसांनी पाच दुकानांवर छापे मारले. या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगाराची साधने आणि रोख रक्कम, असे एकूण 2 लाख 84 हजार 230 रुपयांचे साहित्य जप्त केले.

जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5, महारसाहत्र लॉटरी (नियंत्रण व कर आकारणी) कायदा 1958 कलम 4, साथीचा रोग अधिनियम 1897 कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.