Chinchwad Crime News : पोलिसांकडून शुक्रवारी 37 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर पोलीसांकडून कारवाई केली जाते. मात्र सरकारने लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यातच दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईमध्येही घट होताना दिसत आहेत.

शुक्रवारी (दि. 13) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

भोसरी पोलीस ठाणे (07), पिंपरी पोलीस ठाणे (03), निगडी पोलीस ठाणे (01), दिघी पोलीस ठाणे (02), म्हाळुंगे पोलीस चौकी (14), वाकड पोलीस ठाणे (05), देहूरोड पोलीस ठाणे (01), तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे (04).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.