chinchwad Crime News : भोसरी, पिंपरी आणि सांगवीतून सात दुचाकी वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – वाहन चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शहरात दररोज वाहने चोरीला जात आहेत. सोमवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एक, भोसरी, पिंपरी आणि सांगवी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे एकूण सात वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात प्रसाद सोपान वायकर (वय 40, रा. आळंदी रोड, दिघी) यांनी फिर्यादी दिली आहे. वायकर यांची 80 हजारांची बुलेट (एम एच 14 / जी एम 7367) अज्ञात चोरट्यांनी मोशी प्राधिकरण येथून चोरून नेली आहे.

विशाल प्रकाश महाजन (वय 23, रा. दिघी रोड, भोसरी) यांची 35 हजारांची हिरो होंडा सीडी डॉन दुचाकी (एम एच 12 / एच ई 3036) पुणे-नाशिक महामार्गावर मेघनाद डायग्नॉस्टिक सेंटर जवळून चोरून नेली.

तर संदीप बाबासाहेब कोरटे (वय 32, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांची 15 हजारांची हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी (एम एच 14 / डी जी 9216) चोरटयांनी शास्त्री चौक, आळंदी रोड भोसरी येथून चोरून नेली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात नितीन सिद्धेश्वर माळी (वय 33, रा. थेरगाव, चिंचवड) आणि प्रेमनाथ वैजिनाथ सोनटक्के (वय 26, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. माळी यांची 20 हजार रुपये किमतीची हिरो पॅशन प्लस दुचाकी (एम एच 25 / व्ही 3692) पिंपरी भाजी मंडई मधून चोरीला गेली. तर सोनटक्के यांची 40 हजार रुपये किमतीची टिव्हीएस दुचाकी (एम एच 14 / एच व्ही 5848) गांधीनगर येथून चोरीला गेली आहे.

सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन वाहन चोरीच्या गुन्ह्यात हरिलाल मोहनलाल सापरिया (वय 55, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) आणि आकाश कुमार कदम (वय 24, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.

सापरिया यांची 20 हजारांची हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी (एम एच 14 / बी एच 9531) अज्ञात चोरट्यांनी माकणचौक, जुनी सांगवी येथून चोरून नेली. कदम यांची 50 हजारांची हिरो स्प्लेंडर दुचाकी (एम एच 11 / सी एक्स 0486) चोरटयांनी वैद वस्ती, पिंपळे गुरव येथून चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.