-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad Crime News : धक्कादायक ! कारमध्ये थांबलेल्या युवतीचा डॉक्टरकडून विनयभंग

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कारमध्ये थांबलेल्या एकवीस वर्षीय युवतीचा एका डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर 19 ऑक्टोबरला भर दुपारी ही घटना घडली. दरम्यान, हे प्रकरण चिंचवड ठाण्याचे निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्याशी निगडित आहे. याप्रकरणातूनच त्यांचे निलंबन करण्यात आले होते.

याप्रकरणी एकवीस वर्षीय पीडित युवतीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. वैभव रामराव लाडे व प्रज्ञा वैभव लाडे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती त्यांच्या ओळखीचा इसम सुशांतकुमार यांच्यासोबत कामानिमित्त चिंचवड पोलीस ठाण्यात आली होती.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

त्यावेळी सुशांतकुमार काही काळासाठी कारमधून बाहेर गेले. त्यावेळी कारजवळ आरोपी डॉ. वैभव लाडे आला. आरोपी डॉक्टरने युवतीला ‘तू सुशांतकुमार सोबत आहेस का’, अशी विचारणा केली.

तिने ‘हो’ उत्तर दिल्यानंतर आरोपी युवतीशी अश्लील भाषेत बोलू लागला. तसेच त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली.

तसेच आरोपीने युवतीच्या अंगाला स्पर्श केल्यानंतर तिने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे आरोपी डॉक्टरने पीडित युवतीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली व ‘तुझा डायरेक्टर सुशांतकुमार याचा गेमच करतो’, अशी धमकी दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, हे प्रकरण चिंचवड ठाण्याचे निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्याशी निगडित आहे. याप्रकरणातूनच त्यांचे निलंबन करण्यात आले होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1