Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून सहा दुचाकी, एक रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून सहा दुचाकी आणि एक तीनचाकी रिक्षा अशी सात वाहने चोरीला गेली. त्याबाबत शनिवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयडीसी भोसरी, चाकण, आळंदी, वाकड आणि सांगवी परिसरातून दुचाकी वाहने तर कासारवाडी येथून रिक्षा चोरीला गेली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आशिष दिलीप जाधव (वय 22, रा. घरकुल वसाहत, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 25 / एस 2630) अज्ञात चोरट्यांनी जय गणेश साम्राज्य चौकातील संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल समोरून चोरून नेली.

चाकण पोलीस ठाण्यात पप्पू संजय सोनवणे (वय 28, रा. वाघे वस्ती, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे याची पाच हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी क्यू 8076) अज्ञात चोरट्यांनी नाणेकरवाडी येथील युनिकेअर हॉस्पिटल जवळून चोरून नेली.

आळंदी पोलीस ठाण्यात संगीता सुरज गोसामी (वय 28, रा. केळगाव रोड, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. गोसामी यांची 15 हजारांची मोपेड दुचाकी त्यांच्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

संदीप विलास दनाने (वय 30, रा. डांगे चौक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दनाने यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 42 / वाय 3945) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

सांगवी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रतीक संतोष कवठे (वय 23, रा. पिंपळे गुरव गावठाण) यांनी 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी एम 0040) चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली आहे. तर बंडू किसन गोसावी (वय 52, रा. कवडे नगर, पिंपळे गुरव) यांनी 20 हजारांची (एम एच 14 / एच इ 2945) दुचाकी चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली आहे.

भोसरी पोलीस ठाण्यात संतोष लिंगाप्पा माळी (वय 47, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. माळी यांची दीड लाख रुप्ये किमतीची तीनचाकी रिक्षा (एम एच 14 / जी सी 9253) कासारवाडी स्मशानभूमी जवळ रस्त्याच्या बाजूला लावलेली असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.