Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून सहा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सहा दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 17) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुयोग सुर्यकांत चव्हाण (वय 24, ता. चव्हाण वस्ती, च-होली बु.) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण यांची 55 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एच बी 5351) चोरट्यांनी बनाच्या ओढ्यातून बुधवारी (दि. 16) रात्री पावणे बारा वाजता चोरून नेली.

पिंपरी पोलीस ठाण्यात मनोज कुमारपाल करोतीया (वय 38, रा. अशोक नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. करोतीया यांची पाच हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए एफ 5214) चोरट्यांनी 13 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान चोरून नेली.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात प्रवीण कुमार अभंगराव हुपळे (वय 33, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. हुपळे यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी पी 6115) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. 15 सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात संकेत सुर्यकांत लंभाते (वय 28, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. लंभाते यांची 30 हजारांची दुचाकी (ए एच 14 / डी व्ही 0852) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. हा प्रकार 16 सप्टेंबर रोजी उघडकीस आला.

देहूरोड पोलीस ठाण्यात विजय राघवेलू मदिला (वय 42, रा. साईनगर, मामुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. मदिला यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी टी 0262) त्यांच्या घरामोरून चोरून नेली.

वाकड पोलीस ठाण्यात दिनेश दिवाकर देशपांडे (वय 37, रा. डांगे चौक, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. देश्पांचे यांची 40 हजारांची दुचाकी (एम एच 12 / एल एच 5572) त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार 28 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत घडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.