Chinchwad crime News : रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली.

रविराज विजय लवांडे (वय 32, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 16) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजता फिर्यादी हे विद्यानगर येथील रोडच्या डिव्हाईडरवर थांबले होते. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील आठ हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.