Chinchwad Crime News : अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अवैध दारू विक्री करणाऱ्या देहू आणि रावेतमधील दोन हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबधित हॉटेल मालक आणि कामगारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पहिली कारवाई देहूगाव ते येलवाडी रस्त्यावर असलेल्या कॉर्नर व्हेज नॉनव्हेज या हॉटेलवर करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल मालक भूषण बेल्हेकर (रा. देहूगाव, ता हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलमध्ये अवैध देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने याठिकाणी छापा टाकून अवैध दारू साठ्यासह 1 लाख 02 हजार 506 मुद्देमाल जपेत केला आहे.

दुसरी कारवाई शेळके वस्ती, रावेत येथील ऑरेंज हॉटेलवर करण्यात आली. याठिकाणाहून 4 लाख 20 हतार 697 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हॉटेल मालक हरिश सिंग यांच्यासह सागर देवकर, शुभम चौहान, इजाज अहमद, प्रिस अग्रेहरी, संतोष नायक, उवघेश वर्मा ( सर्व रा. रावेत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वाघमारे, पोलीस उपनिरिक्षक सोळंखे, पोलीस नाईक अनिल महाजन, पोलीस नाईक स्वप्निल खेतले, पोलीस नाईक संगीता जाधव, पोलीस शिपाई दिपक शिरसाट, पोसीस शिपाई योगेश तिकडे, पोलीस शिपाई मारोतराव जाधव, पोलीस नाईक खेतले, नाईक दीपक साबळे, नाईक भगवंता मुठे, हवालदार असवले यांच्या पाथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.