Chinchwad Crime News : अवैधरित्या दारूविक्री आणि हुक्का पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने चिखली परिसरात अवैध दारू विक्री प्रकरणी, तर रावेत परिसरात हुक्का पार्लरवर कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 61 हजार 588 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चिखली पोलीस स्टेशन हद्दीत गणेशनगर- तळवडे येथे तळवडे- निगडी रोडवर असलेल्या रोडच्या डाव्या बाजुच्या कॉर्नर हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या ताब्यात बाळगुन त्याची विक्री होत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. 12) कारवाई केली. या कारवाईत 17 हजार 348 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या, चार हजार 210 रुपये रोख रक्कम असा 21 हजार 558 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सचिन सिध्दप्पा शेट्टी (वय 35, रा. तळवडे, पुणे) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

रविवारी (दि. 13) सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांना माहिती मिळाली की, गुनाजी व्हेज नॉनव्हेज ढाबा तसेच नर्मदा व्हेज नॉनव्हेज ढाबा, भोंडवे कॉर्नर रॉयल कासा सोसायटीसमोर, रावेत येथे विनापरवाना अवैधरित्या आर्थिक फायद्यासाठी विदेशी दारुच्या बाटल्या तसेच हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य ताब्यात बाळगून गि-हाईकास विदेशी दारू तसेच हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.

त्यात 18 हजार 880।रुपये रोख रक्कम, 19 हजार 550 रुपयांचे हुक्का पिण्याचे साहित्य, एक हजार 600 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा 40 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सुरेश शंकर विश्वकर्मा (वय 21, रा. गुनाजी ढाबा व्हेज नॉनव्हेज, रावेत कॉर्नर, पुणे. मुळ रा. साफेबनगर, पोस्ट गोयलपाणी जि. आच्छाम, नेपाळ), आश्विन रमेश राठोड (वय 27, रा. शिंदेवस्ती, रावेत) व इतर तीन जणांच्या विरोधात रावेत पोलीस चौकी येथे भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई), सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण) सन 2003 चे कलम 4, 21, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

या दोन्ही कारवयांमध्ये एकूण 61 हजार 588 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस अंगलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, संगिता जाधव, राजेश कोकाटे, जालिंदर गारे, सोनाली माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.