Chinchwad Crime News : निगडी, आळंदीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – ओटास्कीम निगडी येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर तर आळंदी येथील एका हॉटेलवर छापा मारून पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली.

शनिवारी (दि. 13) दुपारी सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली की, अंकुश चौक, ओटास्किम निगडी येथे सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला काहीजण कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी 24 हजार 400 रुपयांची रोकड, 68 रुपयांचे मटका साहित्य, 21 हजार 200 रुपयांचे सात मोबाईल फोन असा एकूण 45 हजार 668 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शत्रुघन मेसा कठारे (वय 50, रा. चिंचवड) आणि अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी-चाकण रोडवर केळगाव आळंदी येथे असलेल्या हॉटेल राजमुद्रा व्हेज नॉनव्हेज ज्यूस बार या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा पथकाने या हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 780 रुपयांची रोकड आणि 8 हजार 58 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.