Chinchwad crime News : वडिलांच्या खून प्रकरणी मुलाला अटक; आजीची पोलिसात फिर्याद

एमपीसी न्यूज – दारू पिऊन आलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात तांब्याची घागर मारून वडिलांचा खून केला. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आरोपीच्या आजीने  पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वेताळनगर, चिंचवड येथे घडला. 

संजय तानाजी सोलंकर (वय 30, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.  चंद्रभागा सतबा सोलंकर (वय 70) असे फिर्याद दिलेल्या आजीचे नाव आहे. तर तानाजी सतबा सोलंकर (वय 52) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय याला दारूचे व्यसन आहे. तो रविवारी (दि. 1) रात्री साडेसात वाजता दारू पिऊन घरी आला. त्याने वडिलांकडे आणखी दारू प्यायला पैसे मागितले.   वडील तानाजी यांनी पैसे देण्यास नकार दिला.

यावरून संजय याने वडिलांच्या डोक्यात घरातील तांब्याची घागर मारली. यामध्ये तानाजी गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.