Chinchwad Crime News : थेरगाव आणि चिंचवडमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – थेरगाव येथे राहत्या घरात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. तर चिंचवड स्टेशन येथे घरात गळफास घेऊन एका वृद्ध महिलेने आत्महत्या केली. या दोन्ही घटना आज (दि. 28, रविवारी) सकाळी उघडकीस आल्या आहेत.

अशोक शरणप्पा कांबळे (वय 45, रा. पडवळनगर, थेरगाव) असे थेरगाव येथील घटनेत आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. मयत अशोक यांनी राहत्या घराच्या हॉलमध्ये छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब नातेवाइकांच्या लक्षात येताच त्यांना त्वरीत पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णलयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

_MPC_DIR_MPU_II

त्यांचे गेल्या आठवड्यापासून पत्नी आणि मुलाशी भांडण सुरू होते असे त्यांच्या भावाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून हे कृत्य केले असावे, अशी शक्‍यता नातेवाईकांनी व्यक्‍त केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

सोनाबाई लक्ष्मण लष्करे (वय 70, रा. रामनगर, चिंचवड स्टेशन) असे चिंचवड स्टेशन येथे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सोनाबाई यांनी राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सोनाबाई यांना त्वरीत रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.