Chinchwad crime News : पिस्तुलाच्या धाकाने तरुणीचे भरदिवसा चिंचवड येथून अपहरण

एमपीसी न्यूज – पिस्तूलाच्या धाकाने तरुणाने भर वस्तीतून एका तरुणीचे अपहरण केले. हा प्रकार आज (मंगळवार, दि. 19) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयासमोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहृत तरुणी नेहमी प्रमाणे सकाळी अकराच्या सुमारास कामावर जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या तरुणाने तिला पिस्तूलाचा धाक दाखवला. तिला दुचाकी चालवण्यास भाग पाडून पळवून नेले.

याबाबत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. आरोपी हा स्थानिक असल्याचे सांगितले जात आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.