Chinchwad crime News: पिंपरी-चिंचवड शहरातून चार दुचाकींसह एका रिक्षाची चोरी

याबाबत बुधवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून चार दुचाकी आणि एक रिक्षा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत बुधवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवीन राघव हेगडे (वय 36, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेगडे यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची हिरो होंडा दुचाकी (एमएच 14 / बीजी 5121) 5 ऑगस्ट रोजी एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुलाखाली पार्क केली होती. तिथून अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

अंकित घिशुलाल जैन (वय 32, रा. ऑटो क्लस्टर, चिंचवड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी जैन यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 14 / एफए 3215) बुधवारी (दि. 2) सकाळी दहा वाजता गवळीनगर, भोसरी येथील मारुती ट्रेडर्स समोर पार्क केली होती. भर दिवसा त्यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार दुपारी दीड वाजता उघडकीस आला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

लखन महावीर पोपळघट (वय 27, रा. च-होली खु., ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पोपळघट यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची हिरो होंडा दुचाकी (एमएच 14 / एचएन 2986) 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या माउली वडापाव सेंटर समोर पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. हा प्रकार सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आला.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

ललित मंगीलाल ओसवाल (वय 47, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ओसवाल यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी (ए एच 14 / डी पी 0684) 25 ऑगस्ट रोजी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलच्या गेट समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 31 ऑगस्ट रोजी उघडकीस आला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

दयानंद वायकांत शिंगे (वय 32, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी शिंगे यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा (एम एच 14 / जी सी 3251) ज्योतिबानगर, काळेवाडी येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयसमोर 31 ऑगस्ट रोजी रात्री सात वाजता पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. हा प्रकार 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.