Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून कारसह सहा वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सहा वाहने चोरून नेली. यामध्ये स्विफ्ट कारचा देखील समावेश आहे. याबाबत मंगळवारी (दि. 3) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रोहन मारुती पोवार (वय 21, रा. निगडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोवार यांची 25 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई ए 5368) अज्ञात चोरट्यांनी म्हाळुंगे येथील स्कोडा व्ही डब्ल्यू कंपनीच्या गेटसमोरील पार्किंगमधून चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

सौरभ जयंत चावरे (वय 36, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांची 12 हजारांची मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्यांनी टिळक चौक निगडी येथून चोरून नेली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

सागर मारुती इरवडे (वय 28, रा. पाषाण, पुणे) यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 12 / के एक्स 9995) अज्ञात चोरट्यांनी फुगेवाडी येथून चोरून नेली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दृश्यंत विश्वंभर पोतदार (वय 39, रा. भोसरी) यांची 25 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई टी 7362) अज्ञात चोरट्यांनी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावरून चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

अशोक बलवंतप्रसाद शुक्ला (वय 46, रा. काळेवाडी) यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 17 / आर 8948) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

विक्रम अण्णासाहेब मराठे (वय 36, रा. वराळे गावठाण, ता.मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची साडेतीन लाखांची स्विफ्ट कार (एम एच 14 / ई यु 5256) मराठे यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.