Pune Crime News : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करून नोकरी घालविण्याची धमकी

0

एमपीसीन्यूज : वाहतूक नियमन करणा-या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून नोकरी घालविण्याची धमकी देणा-या दोघा भावडांना सिंहगड पोलिसांनी अटक केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेआठच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल सिग्नलजवळ घडली.

अमित नागपुरे (वय २०) आणि सुमित नागपुरे (वय २०, रा. कसबा पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सुरेश मारकड यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक मारकड संतोष हॉल सिग्नलवर वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी त्यांनी दुचाकीवरून चाललेल्या नागपुरे भावडांना अडविले.

त्याचा राग आल्यामुळे त्यांनी मारकड यांना धक्काबुक्की केली. त्यांना शिवीगाळ करून ‘तुझी नोकरी घालवतो, तुझ्याकडे बघतोच’, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment