Chinchwad crime News : घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांसह तिघांना अटक; घरफोडीचे सात गुन्हे उघड

6 लाख 87 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – घरफोड्या (burglary) करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांसह तीन जणांना वाकड पोलिसांनी ( wakad police) अटक ( Arrest) केली. त्यांच्याकडून 6 लाख 87 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. तसेच घरफोडीचे सात गुन्हेही उघडकीस आले (Seven burglary cases uncovered). 

प्रकाश ऊर्फ नानाभाऊ शंकर लंके (वय 44, रा. विश्रांतवाडी, पुणे), समीर ऊर्फ सलीम महेबूब पैलवान शेख (वय 39, मारूंजीरोड, हिंजवडी) आणि ओंकार विभिषण काळे (वय 18, रा. धानोरी रोड, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश ( Police Commissioner Krishna Prakash) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंकज पाटील (रा. वाकड) यांच्या घरी 14 जानेवारी 2021 रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीचा तांत्रिक तपास केल्यावर पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत आणखी सहा गुन्हे केल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी आरोपींकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 118 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी तसेच चोरीच्या पैशातून घेतलेली नवीन जावा दुचाकी, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, घरगुती साहित्य तसेच घरफोडी वापरण्यात येणारे साहित्य, असा एकूण सहा लाख 87 हजार 650 रुपयांचा ऐवज जप्त केला.

_MPC_DIR_MPU_II

वाकड पोलिसांनी केलेल्या तपासात वाकड पोलीस ठाण्यातील पाच, हिंजवडी आणि वडगाव मावळमधील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

आरोपी प्रकाश लंके याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 16, खडकी पोलीस ठाण्यात चार, लोणीकंद आणि विमानतळ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण 22 गुन्हे दाखल आहेत.

तर आरोपी समीर शेख याच्यावर लोणावळ्यात दोन तर लोहमार्ग पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपी लंके हा माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ-नॅशनल पार्टीचा ( Minority Security Federation -National party) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ( state Vice President) असल्याचे सांगत आहे. त्याबाबत त्याचे ओळखपत्र देखील त्याच्याकडे आहे. हाजी मस्तानच्या ( Haji mastan) दत्तक पुत्र ( Adopted Son) सुंदर शेखरची ( Sunder shekhar) ही पार्टी आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुकत आनंद भोईटे, सहायक आयुक्‍त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, तपास पथकाचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, दीपक कादबाने, कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र मारणे, दीपक भोसले, बापूसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन ढोरजे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, सुरज सुतार, शाम बाबा, सचिन नरूटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, कौतेय खराडे आणि नुतन कोंडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.