Chinchwad Crime News : निगडी, हिंजवडीमधून तीन कार, भोसरीमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांनी आता आपला मोर्चा महागड्या कार चोरण्याकडे वळवला आहे. निगडी परिसरातून एक कार तर हिंजवडी परिसरातून दोन कार चोरीला गेल्या आहेत. तर भोसरी मधून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

मोनिश नंदकुमार पवार (वय 25, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात कार चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली आहे. राजीव दयासिंग हंस यांच्या नावावर असलेली 65 हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार (एम एच 02 / ए पी 6199) अज्ञात चोरट्यांनी लोकमान्य हॉस्पिटलमागे निगडी येथून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 26) सकाळी सव्वासात वाजता उघडकीस आली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

अनिल रामगोपाल गुप्ता (वय 60, रा. विजयनगर, इंदोर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या टाटा हेक्सा (एम एच 14 / एच क्यू 3843) ही 10 लाख रुपये किमतीची तर टाटा नेक्सॉन (एम एच 14 / एच के 0998) सहा लाख रुपये किमतीच्या या दोन कार 19 ते 25 डिसेंबर या कालावधीत मारुंजी येथील कोलते पाटील सोसायटीच्या बाहेर पार्क केल्या होत्या. त्या कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

अमोल सुरेश खैरे (वय 35, रा. खराडी रोड, चंदननगर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खैरे यांची 15 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भोसरी मधील पीएमटी चौकातून चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.