Chinchwad Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दोन महिलांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून अनैतिक कृत्यासाठी नेले. तिच्यासोबत एका तरुणाने लैंगिक अत्याचार केले. त्यात ती मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार मार्च ते सप्टेंबर 2020 या कालावधीत चिंचवड येथे घडला.

सचिन पारधी उर्फ काळ्या (वय 25, रा. दापोडी), आफरिन शेख (वय 25, रा. दापोडी), अनिता उर्फ ताई तिपाले (वय 25, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नवे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आफरिन आणि अनिता या दोघींनी पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून अनैतिक कृत्यासाठी नेले. अल्पवयीन मुलीवर आरोपी सचिन याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यात ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.