Chinchwad crime News : शस्त्र बाळगल्याप्रकरणी चाकण, चिंचवडमधून तिघांना अटक

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्याप्रकरणी चाकण येथून दोघांना, तर चिंचवडमधून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तिघांकडून तीन कोयते जप्त करण्यात आले आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 3) तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तोसिफ आयज शेख (वय 26), नजीर अमन मुल्ला (वय 37, दोघे रा. चाकण) या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुवारी (दि. 3) दुपारी चार वाजता चाकण गावात माणिक चौक ते मच्छी मार्केट या रस्त्यावर लोखंडी कोयते घेऊन फिरत असताना दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 200 रुपये किमतीचे दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

भूषण सुधरी गुंडगळ (वय 36, रा. थेरगाव) या आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली.

आरोपी भूषण त्याच्या कारमधून कोयता घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला अटक करून कारमधून दोन कोयते जप्त केले.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.