Chinchwad Crime News : भोसरी, दिघी, सांगवीतून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता

एमपीसी न्यूज – भोसरी, दिघी आणि सांगवी परिसरातून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शनिवारी (दि. 11) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा 17 वर्षीय मुलगा सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाला. मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन कशाचे तरी अमिष दाखवून त्याला पळवून नेल्याचा संशय फिर्यादी यांचा आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दिघी पोलीस ठाण्यात 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 11) दुपारी घडला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

सांगवी पोलीस ठाण्यात 33 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या 16 वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. हा प्रकार शुक्रवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सांगवी परिसरात घडला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.