Chinchwad crime News : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; आणखी तीन दुचाकी, एक टेम्पो चोरला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी आणखी तीन दुचाकी आणि एक टेम्पो चोरून नेल्याबाबत सोमवारी (दि. 29) वाकड, एमआयडीसी भोसरी, भोसरी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अब्दुल ह्कीय शेख (वय 49, रा. नवी सांगवी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख यांची 35 हजारांची मोपेड दुचाकी (एमएच 14 / ईबी 5617) अज्ञात चोरट्यांनी कस्पटेवस्ती, वाकड येथून चोरून नेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सुमित दीपक उत्तेकर (वय 32, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि. 28) पहाटे एक ते दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून त्यांची 40 हजारांची दुचाकी (एमएच 14 / एचए 1488) चोरून नेली आहे.

दाविद देवाशिष पहिलवान (वय 27, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पहिलवान यांची 15 हजारांची दुचाकी (एमएच 14 / एचटी 1198) अज्ञात चोरट्यांनी एसटी डेपो रोड, दापोडी येथून चोरून नेली आहे.

हितेश घनशामसिंग चहार (वय 29, रा. मामुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चहार यांचा अडीच लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो (एमएच 14 / एचजी 2998) रविवारी (दि. 27) रात्री नऊ ते सोमवारी (दि. 28) सकाळी आठ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.