गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी तीन खून

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी तीन खून झाले. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. निगडी, तळेगाव आणि हिंजवडी येथे खुनाच्या घटना घडल्या आहेत. दोन खुनाच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली असून हिंजवडी खून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओटास्कीम येथे पाच जणांनी मिळून एका व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची दुसरी घटना घडली. सोमवारी सकाळी घोरावडेश्वर डोंगरावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची तिसरी घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूस येथे एकाचा खून झाल्याची माहिती मिळाली आहे. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Latest news
Related news