Pimpri Chinchwad crime news : भोसरी, पिंपरी, हिंजवडीमधून तीन दुचाकी चोरीला

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एमपीसी न्यूज – भोसरी, पिंपरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 24) तीन दुचाकी चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत सुरज सुबोध धैर्यवान (वय 49, रा. कोथरूड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र प्रदीप देवस्थळी यांच्या नावावर असलेली बजाज पल्सर दुचाकी (एमएच 12 / बीके 1868) फिर्यादी धैर्यवान वापरत होते. धैर्यवान यांनी 17 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता दुचाकी भोसरी येथील पीएमटी चौकात उड्डाणपुलाखाली पार्क केली.

दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार त्याच दिवशी दुपारी पावणेसहा वाजता उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत रमेश लिंबराज कुलकर्णी (वय 44, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी यांची 50 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 14 / एचपी 6788) 24 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मोहननगर, चिंचवड येथील श्री ऑटो वर्क्स येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत राहुल हनुमंत चांदेरे (वय 35, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चांदेरे यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी 2 ऑगस्ट रोजी रात्री सात वाजता सुसगाव येथील शितळादेवी मंदिराजवळ पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 3 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.