Chinchwad crime News : पिंपरी, चिंचवड, चाकणमधून तीन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि चाकण परिसरातून तीन वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. यामध्ये एक पल्सर, एक बुलेट आणि एका कारचा समावेश आहे. रविवारी (दि. 13) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मयूर उत्तमराव जाधव (वय 27, रा. साई चौक, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जाधव यांनी त्यांची 60 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच 15 / एफझेड 3338) 9 सप्टेंबर रोजी रात्री घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी पार्किंगमधून चोरून नेली. हा प्रकार दुस-या दिवशी सकाळी उघडकीस आला.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

परमचंद अमरचंद वर्मा (वय 47, रा. गांधी पेठ, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वर्मा यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची रॉयल इन्फील्ड बुलेट (एमएच 14 / सीएफ 7071) त्यांच्या घराजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची बुलेट चोरून नेली.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

विजयकुमार बिहारीलाल गुप्ता (वय 35, रा. खंडोबामाळ, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुप्ता यांनी त्यांची एक लाख 25 हजार रुपये किमतीची कार (एमएच 14 / सीएन 0925) शनिवारी (दि. 12) रात्री दहा वाजता आळंदी फाट्यावरील माउली हॉटेलसमोर पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 13) सकाळी उघडकीस आला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.