Chinchwad crime News : ज्वलनशील पदार्थ टाकून कार पेटवली

एमपीसी न्यूज – ज्वलनशील पदार्थ टाकून पार्क केलेली कार अज्ञातांनी पेटवून दिली. यामध्ये कार जळून खाक झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 1) पहाटे दोन वाजताच्या सुमारास शाहूनगर, चिंचवड येथे घडली.

अशोका देविदास आढाव (वय 55, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याबाबत रविवारी (दि. 1) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आढाव यांच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार (एम एच 14 / जी ए 8923) आहे. शनिवारी रात्री त्यांनी त्यांची स्विफ्ट कार सोसायटीच्या बाजूला पार्क केली. रात्री अज्ञातांनी कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून कार पेटवून दिली. यामध्ये कार जळून खाक झाली.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.