Chinchwad Crime News : सासरच्यांना हवा वंशाचा दिवा पण झाल्या मुलीच; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घेतले पेटवून

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच घडला प्रकार

एमपीसी न्यूज – सासरच्या लोकांना वंशाला दिवा हवा होता. मात्र विवाहितेला मुली झाल्या. त्यावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने रॉकेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. ही घटना 10 मार्च 2021 रोजी प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे घडली.

आनंद छगनराव खैरनार, छगनराव सुखलाल खैरनार, कमलाबाई छगनराव खैरनार, अलका कैलास ठाकरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासरच्या मंडळींना वंशाला दिवा हवा होता. त्यामुळे त्यांनी विवाहितेकडे मुलाची मागणी केली. मात्र, विवाहितेला सतत मुलीच झाल्या. त्यावरून आरोपी हे विवाहितेला घालून पाडून बोलत होते.

या त्रासाला कंटाळून विवाहितेने 10 मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजता पांढऱ्या रंगाचे रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन पेटवून घेतले. त्यात विवाहित महिला 50 ते 55 टक्के भाजली आहे. विवाहितेला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.