-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad crime News : चार पोलीस ठाण्यातील 12 गुन्हेगार एकाच दिवशी तडीपार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ दोनच्या हद्दीतील 12 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झिरो टॉलरन्स ही मोहीम राबवली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवण्याबाबत परिमंडळ दोन मधील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना देण्यात आले होते.

त्यानुसार वाकड आणि देहूरोड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले. गुन्हेगारांची पार्श्वभूमी पडताळून तब्बल 12 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. हिंजवडी, वाकड, देहूरोड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे गुन्हेगार असून त्यांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी –

सुधाकर शिवाजी लिमकर (रा. पुनावळे, पुणे)
तुषार महादु बावकर (रा. मुळशी पुणे)

वाकड पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी –

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

इरफान जमशेर खान (रा. थेरगांव, पुणे)
स्वप्नील उर्फ भोन्या प्रकाश घाडगे (रा. म्हातोबानगर, वाकड, पुणे)
सुनिल विश्वनाथ ठाकुर (रा. रहाटणी, पुणे)
दिपक बाळु धोत्रे (रा. निगडी, पुणे)

देहूरोड पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी –

समीर अकबर शेख (रा. थेरगांव, पुणे)
शुभम उर्फ राजु राजेद्र तरस (रा. किवळे, पुणे)
अमीर बाडी समीर शेख (रा. गांधीनगर, देहूरोड, पुणे)

सत्वील चित्रा स्वामी (रा. देहुरोड, पुणे)
कोमल/ कमल बाबु हिरेमठकर (रा, देहुरोड, पुणे)

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी –

सदानंद अरुण चव्हाण (रा. परंदवडी, मावळ, पुणे)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1