Chinchwad Crime News : एमआयडीसी भोसरी, तळेगाव दाभाडे परिसरात दोन अपघात; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा दोन अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

एमआयडीसी भोसरी परिसरातील घटना पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे शुक्रवारी (दि. 10) रात्री सव्वानऊ वाजता घडली. वाहिद साहिद खान (रा. फतेपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कंटेनर चालकाचे नाव आहे. बाळू शंकर कोळेकर (वय 50, रा. मु. पो. धामणे, ता. खेड, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. 11) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

फिर्यादी यांचा भाऊ काळूराम शंकर कोळेकर (वय 46, रा. सद्‌गुरूनगर, भोसरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास मृत काळूराम कोळेकर हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी समोरून आलेल्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनर सिग्नलला धडकून पलिकडच्या बाजूला गेला.

त्यानंतर कंटेनरने मृत काळूराम यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कंटेनरने खासगी आराम बसलाही धडक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव दाभाडे परिसरातील घटना सोमाटणे फाटा ते परंदवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. शनिवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. मिक्सर गाडी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लल्लू प्यारेसिंग (वय 26, रा. सोमाटणे, परंदवडी, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ नानुबाबू प्यारे सिंग (वय 22) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानुबाबू शनिवारी सायंकाळी किराणा साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून परंदवडी येथे जात होते. पाऊस आल्याने ते एका झाडाखाली थांबून रेनकोट घालत होते. दरम्यान, एका मिक्सर वाहन चालकाने हयगयीने वाहन चालवून मिक्सर पलटी केला. यामध्ये नानुसिंग यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.