Chinchwad Crime News : चिंचवड आणि तळेगावात दोन घरफोड्या

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी परिसरातून भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 87 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तर तळेगाव दाभाडे येथील एका अपार्टमेंट मधील दोन घरे फोडली असून एक कार चोरून नेली आहे. याबाबत शनिवारी (दि. 26) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

संतोष शांतप्पा नागलापूर (वय 38, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागलापूर यांच्या घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी 87 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली. दरम्यान फिर्यादी यांच्या घरात लग्न सोहळा असल्याने ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. विवाह सोहळा झाल्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

रिटा नंदकिशोर जुगसेनिया (वय 30, रा. स्वराज्यनगरी, तळेगाव, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुगसेनिया यांच्या अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी शुक्रवार (दि. 25) रात्री पावणे दहा ते शनिवार (दि. 26) सकाळी साडेआठ या कालावधीत दोन घरे फोडली. त्यातील फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून एक लाखाचे दागिने आणि तीन हजारांची रोख रक्कम चोरून नेली.

त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणारे संजय ब्रह्मा यांच्या घरात देखील चोरी केली. मात्र, त्यांच्या घरातून कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याबाबत माहिती मिळाली नाही. फिर्यादी यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली अरुण कुमार दास यांची एक लाख तीन हजारांची अल्टो कार (एम एच 14 / ए इ 4483) देखील चोरट्यांनी चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी आणि चाकणमध्ये उघड्या दरवाजावाटे चोरी करून दीड लाखाचा ऐवज लंपास

पिंपरी आणि चाकण परिसरात अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे चोरी करून एक लाख 61 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत शनिवारी (दि. 26) पिंपरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात अंकुश त्रिंबक पवार (वय 26, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. 26) सकाळी साडेसात वाजता फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातून 95 हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

चाकण पोलीस ठाण्यात किरण भागुजी डुकरे (वय 32, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. डुकरे यांच्या घरातून चोरट्यांनी 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि एक चांदीचे नाणे असा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सकाळी बारा ते दुपारी 12 वाजून 20 मिनिटे या कालावधीत घडला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.